बातम्या

स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनास यश

Success to the Thiya movement of Swabhimani


By nisha patil - 6/12/2023 4:39:36 PM
Share This News:



स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनास  यश 

दालमिया कारखान्यांकडून 3300 रुपये पहिली उचल

 84 रूपये कारखाना व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर जमा होणार 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दत्त दालमिया आसुर्ले पोर्ले या कारखान्यावरती मंगळवारी एफ. आर. पी अधिक 100 रूपये या मागणीसाठी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू होते. दालमिया कारखान्याने 3200 रूपये प्रमाणे पहिली उचल जाहीर केली होती. त्यानंतर सायंकाळी कारखाना व्यवस्थापनाने स्वाभिमानीची एफ. आर. पी अधिक 100 रूपयाची मागणी मान्य करत 3300 रूपये पहिली उचल उद्यापासून शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असून उर्वरीत 84 रूपये कारखाना व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर जमा करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे.


स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनास यश