बातम्या
यशस्वी मंच आयोजित संक्रात सोहळा 2025 दिमाखात संपन्न
By nisha patil - 1/20/2025 3:30:01 PM
Share This News:
यशस्वी मंच आयोजित संक्रात सोहळा 2025 दिमाखात संपन्न
महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या यशस्वी मंचितच्या हळदी-कुंकू समारंभ 2025 ने महिलांमध्ये चांगलीच उत्सुकता आणि सहभाग निर्माण केला. या कार्यक्रमात फॅशन शो, खेळ पैठणीचा, तसेच डान्स स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याशिवाय महिलांसाठी विविध प्रकारचे स्टॉलही उभारण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
यशस्वी मंचित या संस्थेची स्थापना मोहिनी मनकुंद्रे आणि स्वप्नाली जगोजे यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केली होती. अवघ्या दोन वर्षांतच या संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यात एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे.
या वर्षीच्या समारंभात प्रायोजक रॅक्सन ज्वेलरी यांच्या सौजन्याने बंपर प्राईज ठेवण्यात आला होता. याशिवाय 100 लकी ड्रॉ काढण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमात एक वेगळा उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक मोहिनी मनकुंद्रे आणि स्वप्नाली जगोजे यांचे विशेष योगदान असून त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला.
कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील मंगल्य लॉनमध्ये हा सोहळा दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमाला रघुनंदन ग्रुप, आर्ट ज्वेलरी, वनकुंद्रे ब्रदर्स अँड कंपनी, यांचा पाठिंबा लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन रघुनंदन सावंत, डॉ. ऋषिकेश सावंत, सुनीता सावंत, डॉ. काजल सावंत, आणि सौ. शुभांगी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये विद्यालक्ष्मी राजसिंह, संज्योक्त कुलकर्णी,सुरेखा शेजाळे संगीता पाटील, दीपिका जाधव, आणि राजन वणकुडे यांचा समावेश होता. या सोहळ्याला तारा न्यूज ने मीडिया पार्टनर म्हणून काम पाहिलं यावेळी महिलांनी भरघोस खरेदी करत उत्साहाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली
यशस्वी मंच आयोजित संक्रात सोहळा 2025 दिमाखात संपन्न
|