बातम्या
राज्य वकील परिषदेची जय्यत तयारी
By nisha patil - 2/12/2023 4:50:22 PM
Share This News:
कसबा बावडा येथील न्याय संकुलात उद्या, रविवारी एकदिवसीय राज्य वकील परिषद कोल्हापूर २०२३ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे दीड हजारांहून अधिक वकील उपस्थित राहणार आहेत.
वकील परिषदेचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहेया परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना व्हराळे यांच्यासह महाराष्ट्र, गोवा येथील प्रमुख उपस्थित राहणार आहेतपरिषदेस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर, संजय देशमुख, राज्याचे ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ, गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पनगम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
न्याय सर्वांसाठी या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही परिषदेची संकल्पना आहे. उद्या, रविवारी सकाळी १० वाजता कसबा बावडा न्याय संकुलात परिषदेला सुरुवात होणार आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे. ही प्रमुख मागणी असणार आहे. यासह वकिलांचे प्रलंबित प्रश्न, नवोदित वकीलांसमोरील आव्हाने, न्यायालयीन कामकाजातील दिरंगाई कमी करण्यावर उपायावर चर्चा होणार आहे. याबाबतचे ठरावही या परिषदेत मंजूर केले जाणार आहेत.
राज्य वकील परिषदेची जय्यत तयारी
|