बातम्या

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी

Successful preparations for the meeting of Sharad Pawar Uddhav Thackeray


By nisha patil - 4/30/2024 7:11:12 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास  आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. १) होणाऱ्या शिव-शाहू निर्धार सभेची जोरदार तयारी सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे राज्यातील अनेक प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. सभेसाठी मोठी गर्दी करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने सुरू आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाउन पहाणी केली.
 

बुधवारी १  रोजी पाच वाजता सभेला सुरूवात होणार असून यासाठी पार्किंग ची सोय, पिण्याच्या सोय करण्यात येणार आहे. यावेळी आम.सतेज पाटील, मालोजीराजे यांनी मैदानाची पहाणी केली. यावेळी सचिन चव्हाण, राजेऊ लाटकर,वसंतराव मुळीक,बाबुराव कदम आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते


शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी