बातम्या

मुस्लिम जोडप्यांची अशीही शिवभक्ती

Such devotion of Muslim couples


By nisha patil - 11/29/2023 7:44:05 PM
Share This News:



छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द ऐकले तरी प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येतो. महाराष्ट्राची ओळख सांगताना ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं अशा छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ह्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा मुस्लिम जोडप्याने पूजन केले आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना अंगावर काटा येईल असं ते दृश्य आहेत हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. हे महाजारांची मनोभावे उपासना करणारे कोण आहेत याची माहिती मिळालेली नाही.  व्हिडीओ शेअर करणारे अरबाज शेख मोकाशी हे साताऱ्यामधील असल्याने हा व्हिडीओ तिथलाच कुठला तरी असावा असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र याबद्दलची ठोस माहिती मिळू शकलेली नाही.


मुस्लिम जोडप्यांची अशीही शिवभक्ती