बातम्या

सांधेदुखीचा सतत त्रास होतोय? रूग्णांनी नियमित केली पाहिजे 'ही' गोष्ट

Suffering from constant joint pain


By nisha patil - 9/16/2023 7:44:59 AM
Share This News:



बदलच्या जीवनशैलीमुळे आजकाल आपल्याला अनेक आजार जडू लागले आहेत. यामधील एक आजार म्हणजे संधिवात. यामध्ये स्वतःची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो.

संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस.. हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे.

अनेक जणांना यावर नेमके काय उपचार असतात याची कल्पना नसते. मात्र नियमित व्यायाम केल्यास सांधेदुखीवर मात करता येते. संधिवातामध्ये दाह आणि तीव्र वेदना, स्नायुंमधील कडकपणा एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण करतो. अगदी सामान्य क्रिया देखील आव्हानात्मक ठरू लागतात. जसं की सकाळी अंथरुणातून बाहेर पडून चालत जाणे, जार उघडणे अशा सामान्य क्रिया देखील त्रासदायक ठरु शकतात.


संधिवाताच्या रूग्णांसाठी व्यायामाचे फायदे

नियमित व्यायामामुळे केवळ सांध्याचे कार्य सुधारण्यास मदत होत नाही तर स्नायुंचा कडकपणा कमी होतो. त्याचसोबत वेदना आणि थकवा दूर होण्यास मदत होते. शारीरीक हालचाल वाढवण्यासाठी जमेल तितकं सक्रिय रहाणं गरजेचं आहं.

डॉ. भोर पुढे सांगतात की, चालणं, पोहणं आणि सायकल चालवणं, एरोबिक्स व्यायामाम केल्याने हृदय तसेच फुफ्फुसाची बळकटी वाढतं, ज्यामुळे सहनशक्ती वाढते आणि एकूणच आरोग्य सुधारते. जॉगिंग सारखे जास्त शारीरिक क्षमतेचे व्यायाम टाळून, कमी तीव्रतेचे व्यायाम करावे. सांध्यावर ताण येणार नाही अशा व्यायामाची निवड करावी.

जर तुम्हाला सांधेदुखी सारखी लक्षणे जाणवत असतील तर स्ट्रेंथनींग वर्कआउट्समध्ये करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. स्नायुंना बळकटी आणण्यासाठी योगसाधना हा एक उत्तम पर्याय आहे.


सांधेदुखीचा सतत त्रास होतोय? रूग्णांनी नियमित केली पाहिजे 'ही' गोष्ट