बातम्या

टाच दुखीने त्रस्त आहात? करा ‘हे’ उपाय

Suffering from heel pain Do this solution


By nisha patil - 9/3/2024 7:28:17 AM
Share This News:



टाच दुखीच्या दुखण्यात खूप वेदना होतात. चालणे अवघड होऊ जाते. अशावेळी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो. घरात उपलब्ध असलेल्या काही वस्तू वापरून हे उपाय करता येतात. तसेच या उपायामुळे चांगला आरामही मिळतो.

टाचांमध्ये असह्य वेदना होत असतील तर नाराळाच्या तेलात मोहरीचे तेल मिसळून गरम करावे. या तेलाने टाचांना काही वेळ मालीश करावे. बर्फाने शेकल्यानेही टाचांचे दुखणे कमी होते. बर्फांच्या तुकड्यांना प्लास्टिकच्या पिवशीमध्ये टाकून टाचांना शेक द्यावा. यामुळे टाचांचे दुखणे कमी होते. तसेच आणखी एक उपाय म्हणजे हळद वापरून करण्यात येणारा उपाय होय. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅँटिऑक्सिडेंट‌्स असते. ज्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.


टाच दुखीने त्रस्त आहात? करा ‘हे’ उपाय