बातम्या
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध – कृषी विभाग
By nisha patil - 8/2/2025 7:55:59 PM
Share This News:
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध – कृषी विभाग
कोल्हापूर – जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे यांनी दिली.
जिल्ह्यासाठी मंजूर खत आवंटनानुसार ८ फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते व एसएसपी खतांचा पुरवठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५६,४१४ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.
गुणवत्तापूर्ण खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी १३ भरारी पथकांमार्फत तपासण्या सुरू असून, दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध – कृषी विभाग
|