बातम्या

उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल केवळ 10 रुपये वाढ

Sugarcane FRP increased by Rs 10 per quintal only


By nisha patil - 6/29/2023 12:59:52 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  केंद्रातील मोदी सरकारने 2023-24 हंगामासाठी उसाच्या ‘एफआरपी’मध्ये अर्थात रास्त आणि किफायतशीर दरात प्रति क्विंटल केवळ 10 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नवीन ‘एफआरपी’नुसार प्रति क्विंटल उसाचा दर 315 रुपये झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 5 रुपयांनी कमीच आहे.

गेल्या वर्षी उसाच्या एफआरपी प्रति क्विंटल 290 वरून 305 रुपये करण्यात आली होती. 15 रुपयांची वाढ झाली होती. यावर्षी केंद्र सरकारकडून एफआरपीमध्ये किती वाढ होते याकडे महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱयांचे लक्ष लागले होते. मात्र, यावेळी केवळ 10 रुपये वाढ केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची बैठक झाली. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी निर्णयाची माहिती दिली. 2023-24 या हंगामासाठी ऊसाचा प्रति क्विंटल एफआरपी 315 रुपये असणार आहे. 3.28 टक्क्यांनी एफआरपी जास्त आहे. 10 रुपये वाढ झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ऑक्टोबर 2023 पासून साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल. तेव्हापासून नवीन एफआरपी लागू होणार आहे. 2023-24 मध्ये प्रति क्विंटल ऊस उत्पादन खर्च 157 रुपये येईल. 10.5 टक्के रिकव्हरी रेट असणाऱया उसाला प्रति क्विंटल 315 रुपये दर मिळेल, असे त्यांनी सांगितले.


उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल केवळ 10 रुपये वाढ