बातम्या
जो कारखाना जास्त दर देईल त्यालाच ऊस देणार - राजू शेट्टी
By nisha patil - 9/16/2023 7:37:03 PM
Share This News:
राज्यातील ऊस बाहेरील राज्यात घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आलीय . अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत आदेश काढले असून यंदाच्या मोसमात राज्यातील ऊसाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखानदारांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कडाडून विरोध केला जात आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानून महाराष्ट्राचे विकासाभिमुख काम करत आहेत असा त्यांचा दावा आहे. मोदी सरकारनं वन नेशन वन मार्केटचे धोरण अवलंबले असून. त्याला कोणतीही शेती उत्पादने आणि पीक अपवाद नाही. मग महाराष्ट्रातील ऊस शेजारच्या राज्यात निर्यात करणार नाही अशी भुमिकाच कशी ट्रीपल इंजिन राज्य सरकारने घेतली ? असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय . एक तर केंद्र सरकारच्या धोरणावर आमचा विश्वास नाही असं सरकारने जाहीर करावं अथवा परराज्यातील ऊस निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा. मुळातच असे निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही. या आदेशाला आम्ही ऊसाच्या सरीत गाडून टाकू. आम्हाला ज्या ठिकाणी चांगला भाव मिळेल तिथेच आम्ही पाठविणार आहे. हिंमत असेल तर तुम्ही आडवून दाखवा असे ही राजू शेट्टी म्हणाले.
जो कारखाना जास्त दर देईल त्यालाच ऊस देणार - राजू शेट्टी
|