स्टेटस वर स्वतः चा फोटो वर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून तरुणाची आत्महत्या

Suicide of a young man with emotional tributes on his own photo on the status


By nisha patil -
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक असलेल्या तरुणाने व्हाॅट्सअॅपला स्वत:चा फोटो ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील कळंब्यात घडली. अवधूत अजित डाकवे  असे त्याचे नाव आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर तो आणि आईसह राहत होता.अवधूत आणि त्याची आई सुरेखा हे दोघेच मंगळवार पेठेतील डाकवे गल्लीत राहत होते. त्याच्या बालपणीच वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने त्याचा सांभाळ केला होता. दोघेही आई एका खासगी दवाखान्यात नोकरी करत होते. नेहमीप्रमाणे दोघेही दवाखान्यात बाहेर पाडल्यानंतर आई जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. अवधूतने दुसऱ्या खोलीत मोबाईलवर स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे हा स्टेटस मित्रांसह नातेवाईकांनी पाहिल्यानंतर त्याला तातडीने फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. स्टेटस अपडेट केल्यानंतर अवधूतने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. गळफास सोडवून अवधूतला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 
एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आईला धक्का बसला आहे. लग्नासाठी प्रयत्न सुरु असतानाच अवधूतने घर बांधून लग्न करु असे आईला सांगितले होते. त्यामुळे कळंब्यात भाड्याने होते. त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरु असतानाच  अवधूतने केलेल्या आत्महत्येमुळेआईला धक्का बसला आहे.


स्टेटस वर स्वतः चा फोटो वर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून तरुणाची आत्महत्या