बातम्या

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या,

Suicide of cousin of accused in Kopardi rape case


By nisha patil - 3/5/2024 4:20:53 PM
Share This News:



संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार   आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोपर्डीच्या पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी  गावात नग्न करून मारहाण आणि शिवीगाळ करत  स्मशानभूमीत बसवले.  या प्रकारामुळे अपमानीत झाल्याच्या भावनेतून तरुणाने आत्महत्या  केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारानंतर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी  कोपर्डीत मोठा बंदोबस्त वाढवला आहे.  
 

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग लिहिला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलिस कर्जत पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या चिठ्ठीत स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बबन बुद्रिक हा कोपर्डीतील निर्भयचा नातेवाईक आहे.  त्यानंतर पोलीसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.


कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या,