विशेष बातम्या

आजाराला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

Suicide of elderly couple due to illness


By nisha patil - 6/22/2023 5:18:52 PM
Share This News:



स्वाभिमानी आणि कष्टकरी अशी ओळख असलेल्या वृद्ध दांपत्याने शेतात स्वतःच्या चितेची तयारी करून, घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. महादेव दादु पाटील (75) आणि त्यांची पत्नी द्वारकाबाई (70) असे या दांपत्याचे नाव असून, आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेतवडे,ता. पन्हाळा य महादेव दादु पाटील व त्यांची पत्नी द्वारकाबाई या वृद्ध दाम्पत्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. या वयातही दिवसभर ते शेतात राबत असल्याने, स्वाभिमानी व कष्टकरी दाम्पत्य म्हणून अख्खा गाव त्यांना आदर द्यायचे.

या दाम्पत्याला आजाराने ग्रासल्याने, आजारास कंटाळून त्यांनी जीवन यात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. आपल्या पश्चात अंत्यविधीस मुलांना त्रास नको म्हणून त्यांनी आपल्या मृतदेहांना अग्नी देण्यासाठी शेतातील एका कोपऱ्यात लाकडे गोळा करून ठेवली. पिण्याची घागर भरून ठेवली. गवत तसेच मयतासाठी लागणारे साहित्यही जमा करून ठेवले. त्यानंतर मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईस नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद कळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, कळे पोलीस पुढील तपास करत आहेत.


आजाराला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या