बातम्या

सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला

Sujay Vikhes celebratory attack on Pawar


By nisha patil - 2/5/2024 5:27:16 PM
Share This News:



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात जास्तीत जास्त सभा व्हाव्या, यासाठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावरून भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात होणाऱ्या सभांवरून त्यांना टोला लगावला आहे.
 

मुंडे आणि विखे परिवाराला शरद पवारांनी कायम त्रास देण्याच काम केलं असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी केला आहे. सुजय विखे सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. या प्रचार सभेत पवारांसोबत होत असलेल्या संघर्षाबाबत बोलताना गोपीनाथ मुंडे  आणि बाळासाहेब विखे सर्वसामान्यासाठी एकत्र आले. त्यावेळी पवारांनी कायमच आमच्या दोन्ही परिवाराला वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून त्रास देण्याचे काम केलं. मात्र, आमच्या दोन्ही परिवारांनी संघर्ष केला. या जनतेने भी आम्हाला साथ दिली. त्रास जरी झाला तरी आम्ही संघर्ष सोडला नाही, असे देखील सुजय विखे यांनी म्हटले आहे


सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला