बातम्या

सनी देओलचा वाढदिवस होणार 'गदर'मय

Sunny Deol s birthday will be Gadar


By nisha patil - 10/19/2023 3:48:59 PM
Share This News:



सनी देओलचा वाढदिवस होणार 'गदर'मय th

1000 तारा सिंहच्या उपस्थित साजरा होणार बर्थडे

अभिनेता सनी देओलसाठी यंदाचा वाढदिवस खूप खास असणार आहे. सनी देओल 1000 तारा सिंहच्या उपस्थित बर्थडे साजरा करणार .

बॉलिवूड अभिनेता सनी देओलसाठी   हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या खूपच खास ठरलं आहे. एकीकडे अभिनेत्याचा एक मुलगा लग्नबंधनात अडकला आहे तर दुसऱ्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. व्यावसायिक आयुष्यात सनीच्या 'गदर 2'  या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 
   सनी देओलचा आज वाढदिवस  आहे. सनी देओल या वर्षीचा वाढदिवस थाटात  साजरा करणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूड मध्ये चालू आहे. 
   मीडिया रिपोर्टनुसार,  सनीचे देशभरातील चाहते त्याच्या स्टुडिओमध्ये 'तारा सिंह'च्या आयकॉनिक गेटअप मध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चाहत्यांसोबत सनी केक कापून आपला वाढदिवस साजरा करणार आहे..


सनी देओलचा वाढदिवस होणार 'गदर'मय