बातम्या

आशिया चषकात आजपासून सुपर 4 स्टेजमधील सामन्यांना सुरुवात

Super 4 stage matches start from today in Asia Cup


By nisha patil - 6/9/2023 4:17:11 PM
Share This News:



 आशिया चषक आजपासून सुपर 4 फेरीच्या  सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. त्यापैकी भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत. तर नेपाळ आणि अफगाणिस्तान हे संघ आशिया चषकातून बाहेर पडले आहेत. सुपर 4 मधील पहिला सामना आज बांगलादेश आणि पाकिस्तान  यांच्यात रंगणार आहे.सुपर-4 स्टेजमध्ये एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर गुणतालिकेतील टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. सुपर-4 स्टेजमध्ये 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 2 सप्टेंबर रोजी दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ समोरासमोर आले होते, परंतु पावसामुळे तो सामना रद्द झाला होता. परिणामी दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला होता.भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप-ए मधून सुपर-4 राऊंडमध्ये दाखल झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी तीन गुण आहेत. या ग्रुपमधून नेपाळचा संघ बाहेर पडला आहे. दुसरीकडे श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ ग्रुप-बीमधून सुपर-4 राऊंडमध्ये पोहोचले आहेत. या ग्रुपमधून अफगाणिस्तानला सुपर-4 राऊंडमध्ये पोहोचता आलं नाही. श्रीलंकन संघ 4 गुणांसह सुपर-4 राऊंडमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेनेबांगलादेश आणि अफगानिस्तानला पराभूत केलं होतं. तर बांगलादेशचा संघ दोन गुणांसह सुपर-4 राऊंडमध्ये पोहोचला आहे. शाकिब अल हसनच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. जर बांगलादेशने अफिगाणिस्तानला पराभूत केलं होतं. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सुपर-4 चा सामना लाहोरमध्ये झाल्यानंतर आशिया चषकातील उर्वरित सगळे सामने कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे. पल्लेकेलेप्रमाणेच कोलंबोमधील सामन्यांनावर पावसाचं सावट आहे. अशा परिस्थितीत सामने रद्द होण्याचीही शक्यता आहे.


आशिया चषकात आजपासून सुपर 4 स्टेजमधील सामन्यांना सुरुवात