पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची इचलकरंजीतील पोलीस ठाण्यांना भेट

Superintendent of Police Mahendra Pandit visited the police stations in Ichalkaranji


By nisha patil - 3/6/2023 6:59:27 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित   यांनी आज इचलकरंजी शहरातील पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली तसेच शहरातील तीन बत्ती चौक परिसरातील असणाऱ्या पोलीस गृह प्रकल्पाला भेट देऊन तेथील    माहिती घेतली तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेऊन जे आरोपी  मोक्का  व इतर गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेत त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनला दत्तक पुत्र योजना राबवणार असल्याचे  पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी सांगितले आहे 
       कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित  यांनी आठ दिवसापूर्वी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनला त्यांनी भेट देण्यास सुरुवात केली आहे यावेळी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आढावा पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. जे आरोपी  कायदा सुव्यवस्था मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल खंडणी मागणी, व्यापाऱ्यांना धमकवणे, दहशत करणे असे आढळल्यास त्यांच्यावर मोका अंतर्गत   कारवाई करणार तसेच कोल्हापूर इचलकरंजी शहरांमध्ये अंतर्गत सर्व सीसीटीव्ही लवकरात लवकर सुरू केले जाईल ज्यामुळे चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना शोधण्यास मोठी मदत होईल .  जे कर्मचारी  नागरिकांची तक्रारघेत नसतील तर त्यांच्यावर देखील कडक  कारवाई करण्याचा इशाराही त्यावेळी दिला. तीनबत्ती   परिसरामध्ये सुरु असलेल्या  पोलीस वसाहत बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी आढावा घेतला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशा सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या . यावेळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,पोलीस उपाधीक्षक  अमरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास अडसूळ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तारा न्यूज साठी इचलकरंजीहुन विनोद शिंगे


पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची इचलकरंजीतील पोलीस ठाण्यांना भेट