बातम्या

ग्रामीण भागात शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा :पाणी गुणवत्ता तज्ञ, विजय सावंत

Supply clean and safe drinking water to rural areas


By nisha patil - 11/2/2024 9:44:06 PM
Share This News:



पैजारवाडी : प्रतिनिधी  ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी समजून प्रभावीपणे काम करावे अशी सुचना पाणी गुणवत्ता तज्ञ, विजय सावंत यांनी दिली
 

पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षण विषयक प्रशिक्षण कार्यशाळेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते 

ग्रामीण भागात पीण्याचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळावे, मिळणाऱ्या पाण्याची नियमितपणे तपासणी करण्यात यावी या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने   पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षण विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले होते
 

या एकदिवशीय प्रशिक्ष्ण कार्यशाळेमध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाणी स्रोतांची स्वच्छता,जलसुरक्षक कर्तव्य व जबाबदाऱ्या,पाणी गुणवत्ता व महत्व, पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती ,पाण्यांपासून निर्माण होणा-या विविध आजारांबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली
जलजीवन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना, हर घर जल गाव घोषित करावयांच्या कार्यवाही, कार्यात्मक नळजोडणी, टीसीएल पावडर तपासणी व गुणवत्ता तसेच पाणी नमुना संकलन पध्दत, पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी. प्रयोगशाळा सरंचना व प्रयोगशाळेपर्यत पाणी नमुने कसे पोहोच करावे,पाणी गुणवत्ता सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण,एफटीके किटव्दारे पाण्याची तपासणी कशी करावी या बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले  या प्रशिक्षण कार्यशाळास उपस्थित गटविकास अधिकारी सोनाली माडकर, विस्तार अधिकारी  पी डी भास्कर, श्री.भोसले श्री.तळपे लॅब केमिस्ट,शेख मॅडम यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,आरोग्यसेवक, आरोग्य पर्यवेक्षक व बी.आर.सी,सी.आर.सी. आरोग्य विभागातील कर्मचारी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

पन्हाळा पं स.सभागृहात पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाट्न करताना गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पी डी भास्कर, श्री.भोसले श्री.तळपे, गोपाळ पाटील आदी मान्यवर


ग्रामीण भागात शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा :पाणी गुणवत्ता तज्ञ, विजय सावंत