बातम्या

अवचितपीर तालीम मंडळ शिवाजी पेठ यांचेकडून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

Support to Maratha Reservation Movement by Avachitpir Talim Mandal Shivaji Peth


By nisha patil - 1/11/2023 4:25:26 PM
Share This News:



राज्यभरातून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहेत गेले कित्येक वर्षे मराठा आरक्षणासाठी  संघर्ष करत आहे, न्यायाचे हक्काचे आरक्षण मिळवणेसाठी मनोज जरंगे यांनी  आमरण उपोषण सुरु केले आहे गेले ८ दिवस ते अन्न पाणी त्याग करून उपोषण करीत आहे त्यांचा हा संघर्ष हा महाराष्ट्रातील मराठा लोकांसाठी आहे त्यांचे या मागणीला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे,

 कोल्हापूर शहरातील अवचितपीर तालीम मंडळ शिवाजी पेठ यांनी देखील मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी घोषणाबाजी करून त्यांनी पाठिंबा जाहीर केला 

यावेळी अवचितपीर तालीम मंडळ चे अध्यक्ष मंजित माने, उपाध्यक्ष दीपक माने, माजी अध्यक्ष अजित शिंदे, रणजित पाटील, विकास सूर्यवंशी, राजू समर्थ, बाबासाहेब पाटील, सुजित चव्हाण, विक्रम साळोखे ,आदी ,तालमीचे आजी -माजी पदाधिकारी ,तसेच जेष्ठ व लहान कार्यकर्ते उपस्थित होते


अवचितपीर तालीम मंडळ शिवाजी पेठ यांचेकडून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा