बातम्या
औरंगजेब विचारांचे समर्थन करणाऱ्यांना थांबवावे : युवा सेना ठाकरे गट
By surekha - 6/22/2023 6:38:36 PM
Share This News:
औरंगजेब विचारांचे समर्थन करणाऱ्यांना थांबवावे : युवा सेना ठाकरे गट
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकाकडून औरंगजेब बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.यानंतर हिंदुत्ववादी संघटनानी या वक्तव्याचा निषेध केला होता, मात्र सध्या कोल्हापुरातील काही संस्था या महिला प्राध्यापिकेचे समर्थन करत आहेत. त्यामुळे औरंगजेबि विचारांचे समर्थन करून शहरात अस्थिरता करणाऱ्यांना थांबवावे अशी मागणी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश माने याबाबतचे निवेदन दिलं. यावेळी बोलताना मनजीत माने यांनी काही दिवसापूर्वी संबंधित महिला प्राध्यापिकांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर संबंधित महाविद्यालयाने देखील त्यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र आता शांत झालेल्या या प्रकरणात कोणत्याही संस्था संघटनांनी सहभाग घेऊन समाजात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा यावेळी दिला.
यावेळी युवा सेना शहर प्रमुख संतोष कांदेकर, प्रतीक भोसले, चैतन्य देशपांडे, रोहित वेधे कीर्ती जाधव, मानसिंग चौगुले, युवती सेना शहराधिकारी सानिका दामूगडे ,माधुरी जाधव, राजश्री मिंचेकर, प्रिया माने आदींसह युवासैनिक उपस्थित होते.
Supporters of Aurangzeb ideology should be stopped: Yuva Sena Thackeray group
|