बातम्या

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झाप झापले..!

Supreme Court slapped Ajit Pawar group


By nisha patil - 3/14/2024 5:23:45 PM
Share This News:



महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेत नाही राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह घड्याळ आणि पक्ष अजितदादा गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही. परंतु, सुप्रीम कोर्टाने अजित दादा गटाला मोठा झटका दिला आहे. राजकीय फायद्यासाठी शरद पवार यांचा नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप याचिका शरद पवार गटाने दाखल केली होती या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर मागितले आहे.

  . सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने अजित पवार गटाला सदर याचिकेवर शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच याची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी निश्चित केली.


सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झाप झापले..!