बातम्या

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार मैदानात?

Supriya Sule Amol Kolhe vs Ajit Pawar in the field


By nisha patil - 1/12/2023 3:56:16 PM
Share This News:



 राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? याचा निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत अजित पवार यांच्यासंदर्भात भेकड शब्द शरद पवार गटाकडून वापरला गेला. त्यावर गुरुवारी सुनील तटकरे यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली. आता सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार मैदानात उतरणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. यामुळे शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये कोण बाजी मारते हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेच.


सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार मैदानात?