बातम्या
सुप्रिया सुळेंनी इंद्रापुरात गाजवली सभा...
By nisha patil - 3/23/2024 4:51:41 PM
Share This News:
बारामतीत निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागले आहे.येथे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या सध्या संपूर्ण मतदारसंघात प्रचार करत आहेत आज बारामतीतील इंदापुरात महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली.
आगामी काळात इंदापूरकर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असे त्या म्हणाल्या.
इंदापूरमध्ये शरद पवार यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. हा तालुका शरद पवार यांच्यावर खूप प्रेम करतो. या इंदापुरात काही राजकीय बदल झाले. या निवडणुकीत काय झालंय काही समजेनासे झाले आहे. मी तीन निवडणुका लढवल्या. मागच्या निवडणुकीत माझ्याविरोधात राहुल कुल यांच संपूर्ण कुटुंब होतं. मी राहुल कुल आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करते की त्यांनी कधीही पातळी सोडून टीका केली नाही. तिन्ही निवडणुका सुसंस्कृत होत्या. पण या निवडणुकीत काय गडबड झाली ते कळत नाहीये.
रोहित पवार, युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत. ते आजोबा शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत. युगेंद्र पवार यांचा दोन वेळा रस्ता अडवण्यात आला. ते लोकशाही पद्धतीने शांततेने प्रचार करत आहेत. मी युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर माझ्यावरही टीका झाली. कुठल्याही मुलावर हल्ला झाल्यावर त्या आईचा कोणी विचार करणार की नाही? टीका करताना पातळी सोडली जात आहे. करेक्ट कार्यक्रम होणार दमदाटी केली जात आहे. पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, असे सांगितले जात आहे. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण त्यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे,
असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. भरणे यांना उद्देशून सुप्रिया सुळेंनी वरील विधान केले.
3 लाखांची लीड
सुप्रिया सुळे भाषण करत असताना सभेत असलेल्या श्रोत्यांकडून जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. विरोधकांवर टीका करताना श्रोते टाळ्या वाजवून सुळेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत होते. विशेष म्हणजे सभेतीलच एका श्रोत्याने सुप्रिया सुळेंना आम्ही 3 लाखांच्या मताधिक्याने विजयी करून दाखवू, असे म्हटले. त्यानंतर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी सुळे यांनी कार्यकर्त्यांना जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले.
सुप्रिया सुळेंनी इंद्रापुरात गाजवली सभा...
|