शरद पवारांनी केलेल्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया...

Supriya Sules reaction after Sharad Pawars announcement of acting president


By nisha patil - 10/6/2023 5:09:49 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे आणि सर्वांचे आभारही मानले आहेत. सुप्रिया सुळेंवर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार , पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.


शरद पवारांनी केलेल्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया...