'सूर्यनमस्कार' हा साधासुधा व्यायाम नाही; ती आहे १२ आसनांची अनोखी मालिका
By nisha patil - 4/6/2023 8:11:35 AM
Share This News:
आपल्या शरीराला तर सर्वांनी 'व्यायाम' हा केलाच पाहिजे. आजही आपल्या समाजामध्ये काही लोकांना ' व्यायाम' म्हणजे काय, त्याचे फायदे, व्यायामाने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे माहितीच नाही.
सध्या अनेक नवनवीन आजार, साथीचे रोग, त्वचेचे रोग, शरीराचे आजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे, शरीराची ताकद, शक्ती, प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, शरीराला निरोगी ठेवतानाच त्याला रोगांपासून कसे वाचवायचे, या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच योग. योगाचा उपयोग नेहमीच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी केला जातो. वैद्यकीय संशोधनातूनही योग हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मानवजातीसाठी वरदान असल्याचे सिद्ध झाले असून शरीराला, मनाला, डोक्याला रिचार्ज करण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार घाला....
बारा आसनांची अनोखी मालिका
> उध्वे नमस्कारासन या प्रकारांत स्तब्ध उभे राहून, पायाच्या टाचांमध्ये ४५ टक्के कोन करून उभे राहावे. हात नमस्कार स्थितीमध्ये छातीजवळ ठेवून मान सरळ ताठ ठेवून राहावे, श्वास घेऊन नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात तसेच पुढे घेऊन आकाशाकडे पाहत मागे वळावे, हात दोन्ही कानांशी चिकटलेले असतील अशा प्रकारे. (टीप- या सूर्यनमस्काराने पोटाचे विकार कमी होतात, उंची वाढण्यास मदत होते.)
> हस्तपादासन : यामध्ये कानाशी चिकटलेले हात तसेच ठेवून कंबरेपासून समोर वाकावे. हात जमिनीवर टेकावे, गुडघे न वाकवता हे करावे आणि श्वास सोडावा. (टीप या सूर्यनमस्काराने अतिरिक्त चरबी कमी होऊन पोट पातळ होते.)
> दक्षिणपादप्रसरणासन : यात डावा पाय पुढे घेत दोन्ही हातांच्यामध्ये ठेवून उजवा पाय लांब मागे ताणावा. छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे. (टीप- या सूर्यनमस्काराने हृदयविकार, फुप्फुस विकार दूर होतात.)
> द्विपादप्रसरणासन : या प्रकारामध्ये दोन्ही पाय मागे घेऊन हात पुढे घेऊन कंबर वर उचलावी. आपल्या शरीराचा भार हातपायांवर ठेवावा. (टीप - या सूर्यनमस्काराने पोट, अन्ननलिका यांना लाभ मिळतो.)
> भुजान्वासन : यात गुडघे जमिनीवर टेकावेत व हनुवटीही जमिनीवर टेकवून हात पुढे करावेत. (टीप - या सूर्यनमस्काराने पाठीचा कणा आणि मान या अवयवांना लाभ मिळतो.
> साष्टांग प्रणिपातासन : यामध्ये संपूर्ण हात, पाय, छाती जमिनीला टेकवावी, पोट आत ओढून घेत श्वास सोडावा. (टीप- या सूर्यनमस्काराने छाती रुंद होते आणि पचनशक्ती वाढते.)
> भुजंगासन : या प्रकारामध्ये पाय जमिनीवर ठेवून म्हणजे झोपून हात कोपयातून दुमडून जमिनीवर ठेवावे व मानेपासून वर पाहावे. म्हणजे छातीपासून वरच्या भागाचे ओझे हातावर पडले पाहिजे. (टीप - या सूर्यनमस्काराने स्त्रियांचे गर्भाशय व मासिक पाळीचे विकार दूर होतात. मूत्राशयाचे विकारही दूर होतात.)
> भूधरासन: यामध्ये हात, पाय जमिनीवर ठेवून कंबरेपासूनचा भाग वर उचलावा, डोळे दोन्ही हातांच्या मध्ये खाली करावेत. (टीप- या सूर्यनमस्काराने पोटाचे विकार कमी होतात.)
> भुजान्वासन: यामध्ये गुडघे आणि डोके जमिनीवर ठेवून नितंब आपल्या टाचांवर ठेवावे व हात पुढे घ्यावेत. या सूर्यनमस्काराने, मान, पाठीचा कणा, व श्वसननलिकेला लाभ मिळतो.)
> दक्षिणपाद संकोचनासन : यात उजवा पाय समोर घेऊन दोन्ही हातांच्यामध्ये ठेवावा, डावा पाय मागे लांब ताणावा. छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे. (टीप - या सूर्यनमस्काराने मान, छाती व पोटाचे विकार नाहीसे होतात.)
> हस्तपादासन : या प्रकारामध्ये कंबरेपासून खाली वाकावे. गुडघे न वाकविता हात जमिनीवर टेकावेत. (टीप- या सूर्यनमस्काराने उंची वाढते. पोट पातळ होते.
> नमस्कारासनः यात सरळ ताठ उभे राहून, हात जोडलेल्या अवस्थेमध्ये छातीजवळ ठेवून उभे राहावे. (टीप-या सूर्यनमस्काराने मन शांत होण्यास मदत करते.)
यावेळी करा सूर्यनमस्कार
शक्यतो सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.
'सूर्यनमस्कार' हा साधासुधा व्यायाम नाही; ती आहे १२ आसनांची अनोखी मालिका
|