कोल्हापुरातील दांपत्याचा संशयास्पद मृत्यू

Suspicious death of a couple in Kolhapur


By nisha patil - 5/31/2023 6:31:28 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे 59 वर्षीय मधुकर दिनकर कदम आणि त्यांची पत्नी 49 वर्षीय जयश्री मधुकर कदम अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिएक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज कदम यांच्या मुलींनी वर्तवलाय. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी कदम दांपत्याचा व्हिसा राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार एस टी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले मधुकर कदम यांचे कुटुंबीय शिवाजी पेठेत राहत होते .एका वर्षांपूर्वीच हे आपल्या कुटुंबासमवेत वडणगे इथे नवीन घरात राहायला आले होते. मधुकर कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी नाही मधुमेहाचा त्रास सुरू होता पंधरा दिवसापूर्वी मुक्त सैनिक परिसरातील एका डॉक्टरांकडून आयुर्वेदिक औषध त्यांनी घेतलं होतं. आज सकाळच्या सुमारास दोघांनीही ते औषध पाण्यात मिसळून प्राशन केलं यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले वीस मिनिटानंतर कदम यांच्या पत्नी जयश्री कदम यांना धाप व लागू लागली आणि त्या बेशुद्ध पडल्या याच दरम्यान दूध आणण्यासाठी गेलेले मधुकर कदम देखील घराजवळील चौकात बेशुद्ध पडले. परिसरातील नागरिकांनी तातडीने कदम दाम्पत्याला प्रथम  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तिथून त्यांना सीपीआर रुग्णालयात आणण्यात आलं. यावेळी सीपीआर मधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं. दरम्यान कदम दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे दोन्ही मुलींना धक्का बसलाय अचानक घडलेल्या या घटनेने वडणगे परिसरात उडाली आहे.


कोल्हापुरातील दांपत्याचा संशयास्पद मृत्यू