बातम्या

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास

Swarajya Rakshak Sambhaji' actress Prajakta Gaikwad first class in degree examination


By surekha - 7/21/2023 5:35:53 PM
Share This News:



'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास

 मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड  सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी'  या मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्री म्हणून प्राजक्ताचा प्रवास सुरू होता. पण त्यासोबत ती शिक्षणदेखील पूर्ण करत होती. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि फक्त उत्तीर्णच नाही केली तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं आहे. तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्ससिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली  
फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे,"फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण. 10 पैकी ग्रेड आहे 8.77. आता अखेर मी इंजिनिअर अभिनेत्री झाले. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने आलिशान घर घेतलं आहे.


'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास