बातम्या
थंडीत हातापायाची बोटं सुजतात?
By nisha patil - 1/22/2024 7:27:56 AM
Share This News:
सध्या देशभरात वाढत्या थंडीमुळे वातावरण गारेगार झाल्याचं पाहायला मिळतंय. हवेमध्ये गारवा असल्याने सगळीकडे वातावरण कूल कूल झालं आहे. मात्र या थंडीमध्ये अनेकांना वेगवेगळे त्रास जाणवतात.
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना हातपाय सुजण्याच्या समस्या उद्भवतात. थंड वातावरणाचा नकळत परिणाम हा शरीरावर होताना दिसतो. त्यामुळे काहीजणांच्या तर हात-पायांवर सूज येते. बदलत्या वातावरणाचा परिणाम हा शरीरावर दिसून येतो. हात-पायाची बोटं लाल होऊ लागतात आणि हातांना खाज येऊ लागते यासाठी आरोग्य तज्ञांच्या सागंण्यानूसार काही घरगुती उपाय यासाठी बेस्ट ठरु शकतात.
हळदीचे तेल :
आयुर्वेदानूसार, हात आणि पायावरील सूज दूर करण्यासाठी हळद मिश्रित तेल हा एक रामबाण उपाय आहे. तिलाच्या तेलामध्ये हळद मिक्स करुन हे तल गरम करुम घ्यावं. तेल थोडा वेळ थंड झाल्यानंतर हळूवारपणे त्याने हात-पायाची मसाज करावी. हळदीत अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. तसंच ज्या ठिकाणी सूज आहे त्या ठिकाणी हळदीचं तेल लावावं यामुळे बोटांची सूज कमी होईल.
कांद्याचा रस :
पायांना आणि हाताला सूज येत असेल तर कांद्याचा रस उत्तम मानला जातो. कांदा किसून त्याचा रस एका वाटीत काढावा. या रसानं दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ कांद्याच्या रसानं हाता पायांना मसाज करावा. कांदा हा अॅंटीसेप्टिक आणि अॅंटीबायोटिक त्तत्वांचे गुणभांडार आहे. थंडीत हात-पाय लाल होऊन जर त्यांना सूज येत असेल काद्यांचा रस काढून तो हात आणि पायांना लावावा, असा सल्ला आरोग्यतज्ञ देतात. थंडीत सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशावेळी कांद्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतात.
थंडीत हातापायाची बोटं सुजतात?
|