बातम्या

इचलकरंजीत सुळकूडसाठी लाक्षणिक उपोषण सुरु

Symbolic fast for Ichalkaranjit Sulkood begins


By nisha patil - 10/13/2023 5:03:30 PM
Share This News:



 इचलकरंजी शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी, या मागणीसाठी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ  एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आला आहे. यास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. 

 इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आजअखेर ही बैठक होऊ शकली नाही. गणेशोत्सवानंतर कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालयात बैठकीत घेण्यात आली होती. या बैठकीत आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे


इचलकरंजीत सुळकूडसाठी लाक्षणिक उपोषण सुरु