बातम्या

सांगलीत आज ओबीसी आरक्षणासाठी लाक्षणीक उपोषण

Symbolic fast for OBC reservation in Sangli today


By nisha patil - 3/10/2023 4:08:52 PM
Share This News:



सांगलीत ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधव आज एकवटले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ही घोषणाबाजी करत ओबीसी बांधवांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं.

सकल मराठा समाज अप्रत्यक्षपणे ओबीसी मधून मराठा आरक्षण मागत आहेत. मराठा समाजाला आम्हाला कधीच विरोध नव्हता परंतु ओबीसींच्या जनभावना आहेत की, ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्य व केंद्र सरकारने मराठ्यांना शैक्षणिक नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षण कायदा करून द्यावा  अशी मागणी  यावेळी ओबीसी बांधवांनी केली. यावेळी  ओबीसी बांधवांसह राष्ट्रीय पदाधिकारी संजय बापू विभुते, जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, आणि जिल्हा सचिव शरद झेंडे उपस्थित होते.


सांगलीत आज ओबीसी आरक्षणासाठी लाक्षणीक उपोषण