बातम्या
टी-20 वर्ल्ड कप काहीच दिवसांवर..
By nisha patil - 5/16/2024 5:25:29 PM
Share This News:
आयपीएलचं 17 वं पर्व संपल्यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. वर्ल्ड कप सुरु होणं ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी आहे. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. आयपीएल झाल्यानंतर त्यांना केवळ एकच सराव सामना खेळायला मिळणार आहे.
भारताची पहिली मॅच आयरलँड विरुद्ध 5 जूनला होणार आहे. भारतीय टीम दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. मात्र, यावेळी टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्माआणि यशस्वी जयस्वाल यांच्या आयपीएलमधील कामगिरीनं सर्वांचं टेन्शन वाढलंय.
टीम इंडियाला 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळालं होतं. त्यांनतर भारताला पुन्हा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. रोहित शर्माचा फॉर्म हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा समजला जातो. रोहित शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये 13 मॅचेसमध्ये एका शतकासह 349 धावा केल्या आहेत. रोहित शर्माला शतक केल्यानंतरच्या पुढील काही डावांमध्ये दोन अंकी धावसंख्या देखील गाठता आलेली नव्हती. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्यानं त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे. मुंबई इंडियन्स 2024 च्या आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात अगोदर बाहेर पडलं आहे.
टी-20 वर्ल्ड कप काहीच दिवसांवर..
|