बातम्या

तब्बल 12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक

Tabus comeback in Hollywood after 12 years


By nisha patil - 5/14/2024 8:45:19 PM
Share This News:



आता तब्बूच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. अभिनेत्री तब्बू आता हॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तब्बूला स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म मॅक्ससाठी निर्मितीसाठी होत असलेली ड्युनची प्रीक्वेल सीरिज 'ड्यून: प्रोफेसी'साठी निवडण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये तब्बू सिस्टर फ्रेंचेस्काची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ही व्यक्तीरेखा बुद्धिमान, शक्तिशाली आणि आकर्षण वाटणारी असणार आहे. एके काळी सम्राटाचे प्रेम असलेल्या फ्रान्सिस्काच्या पुनरागमनामुळे राजधानीतील सत्तेचा समतोल बिघडणार आहे. तब्बूच्या अभिनयाची छाप वेगवेगळ्या भूमिकेत पडली आहे. आता, या वेब सीरिजमध्ये तब्बू आपल्या अभिनयाची छाप सोडण्यास सज्ज झाली आहे. तब्बूच्या चाहत्यांना या वेब सीरिजची उत्सुकता लागली आहे.  तब्बू पुन्हा एकदा हॉलिवूड प्रोजेक्ट करणार आहे. ऑस्कर विजेत्या फिल्म फ्रँचायझी 'ड्यून' हा प्रीक्वल असणार आहे. ज्याची कथा चित्रपटात दाखवलेल्या घटनांपूर्वीची असेल. ही कथा एका वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. यामध्ये तब्बूची महत्त्वाची भूमिका आहे. याआधी तब्बूने हॉलिवूडमधील 'द नेमसेक' आणि 'लाइफ ऑफ पाय' या दोन प्रोजेक्टमध्ये काम केले आहे


तब्बल 12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक