बातम्या
बलिदान मास पाळण्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा.
By nisha patil - 3/3/2025 2:45:43 PM
Share This News:
बलिदान मास पाळण्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा.
सकल हिंदु समाज संघटनांची मागणी.
राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील एका शाळेत छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने ४० विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याची घटना घडली.याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.शाळेचे मुख्याध्यापक्, सरवडे गावचे सरपंच यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय. यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले. दरम्यान मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.आंदोलनात विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष कुंदन देसाई,सुरेश यादव ,शिवानंद स्वामी,आशिष लोखंडे,पराग फडणीस,सुनील घनवट,यांच्यासह पदाधिकारी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
बलिदान मास पाळण्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा.
|