बातम्या
स्मशानभुमीत गैरप्रकार करणाऱ्यांचा बंदोबस्त करा : पंचगंगा विहार मंडळाची मनपाकडे मागणी
By nisha patil - 3/13/2024 8:34:12 PM
Share This News:
स्मशानभुमीत गैरप्रकार करणाऱ्यांचा बंदोबस्त करा : पंचगंगा विहार मंडळाची मनपाकडे मागणी
कोल्हापूर : पांडुरंग फिरींगे - कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभुमीतील राख काही लोकांकडून चाळून नदीमध्ये टाकली जातेय. त्यामुळे नदीचं प्रदूषण होत आहे . प्रेताच्या चेहऱ्याकडील भागाची राख चाळून त्यातील सोन्याचा शोध कांही लोक घेत आहेत. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. असे गैरप्रकार करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जुना बुधवार पेठेतील पंचगंगा विहार मंडळाच्यावतीनं करण्यात आलीय. या मागणीचं निवेदन महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना आज देण्यात आलं.
या पंचगंगा स्मशानभुमीत असणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडून प्रेताचे लचके तोडले जात आहेत. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
स्मशानभुमीत गैरप्रकार करणाऱ्यांचा बंदोबस्त करा : पंचगंगा विहार मंडळाची मनपाकडे मागणी
|