बातम्या
‘खोबरेल तेला’ने दातांची अशी घ्या काळजी ! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
By nisha patil - 7/3/2024 7:38:32 AM
Share This News:
दातांचे आरोग्य राखल्यास अनेक समस्या दूर ठेवता येतात. दात किडणे, दुखणे, तोंडाची दुर्गंधी येणे आदीमुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते. दातांची काळजी घेण्यासाठी काही खास घरगुती उपाय असून ते केल्यास दातांचे आरोग्य चांगले राहू शकते. खोबरेल तेलाने दातांची काळजी कशी घ्यावी, याची माहिती आपण घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ जवळपास २० मिनिटे ऑईल पुलिंग म्हणजेच खोबऱ्याच्या तेलाने गुळणी करा. यामुळे दात निरोगी राहतात. तोंडालाही याचा फायदा होतो. हिरड्या निरोगी राहतात. सर्दी, खोकला, घशाला होणारा त्रास या समस्या दूर होतात.
२ दातांची स्वच्छता
दातांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी ब्रश करणे आणि गुळणी करण्याची गरज असते. खोबरेल तेलाने २० मिनिटे गुळणी केल्यास दात स्वच्छ होतात.
३ शुद्ध तेल वापरा
खराब तेलाने गुळणी करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे तेल वापरा.
४ केवळ स्वच्छता
खोबरेल तेलाने गुळणी केल्यास दातांमधील घाण निघते. दात चमकदार होतात.
५ दुखणे होते कमी
या तेलाच्या गुळणीने थोडावेळ आराम नक्कीन मिळेल, पण नेहमीसाठी त्रास दूर होणार नाही.
‘खोबरेल तेला’ने दातांची अशी घ्या काळजी ! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
|