बातम्या

वाहतूक समस्या,अपु-या गटारींबाबत त्वरित कार्यवाही करा - इनाम संघटनेची महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

Take immediate action on traffic problems inadequate drains


By nisha patil - 6/15/2023 6:24:52 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील विविध मुलभूत नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी , याबाबत इनाम संघटनेच्या वतीने महापालिकेचे 
प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की ,
इचलकरंजी शहरातील पंचवटी टॉकीज ते तीन बत्ती चार रस्ता चौक आणि थोरात चौक ते कापड मार्केट व राजीव गांधी भवन परिसरात मुख्य रस्त्यावर ट्रक लावलेले असतात. त्यामुळे  वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत असतात. त्यामुळे इचलकरंजी शहराच्या वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने ट्रक पार्किंगसाठी इतरत्र सोय करावी , ट्रक टर्मिनलसाठी तातडीने प्रयत्न करून वाहतूक कोंडी सोडवावी.मंगळवार व शुक्रवार आठवडा बाजारावेळी आवाडे टॉकीजसमोरून अवजड वाहतूक बंद करून रिंग रोड मार्गे करण्यात यावी.सुतार मळा येथे सुरु असलेले डांबरीकरण काम अतिशय निकृष्ट व अपूर्ण असून त्याची चौकशी करण्यात यावी.सांगली रस्ता डिपीला दाखवल्याप्रमाणे मोठा व्हावा ही नागरिकांची मागणी असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नाहीत. त्याची तातडीने कार्यवाही झाल्यास पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी घुसते ते थांबेल. बिशप इंग्लिश स्कूल ते आरगे भवन रोड या परिसरात अपूर्ण गटार केली आहे. सदर गटार कोणत्या मक्तेदाराने केली आहे , तसेच तेथील इंजिनियर कोण याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.वंदे मातरम क्रीडांगण समोरील बाजूस शाळा असल्याने वाहतूक जास्त आहे. सदर भागात स्पीडब्रेकर करण्याची मागणी वारंवार झालेली असून सदर भागात प्लास्टिक स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत.राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ कंपाऊंडमध्ये नागरिक रात्री खाद्यपदार्थ खाऊन कचरा करतात.तेथे सुरक्षारक्षक नेमून स्वच्छतेची दक्षता घेण्यात यावी.
याबाबत प्रभारी उपायुक्त 
केतन गुजर यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल , असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी इनामचे राजू कोन्नुर,राम आडकी,उदयसिंह निंबाळकर,संजय डाके,महेंद्र जाधव,लक्ष्मण पाटील,दीपक अग्रवाल,डॉ.सुप्रिया माने,कल्पना माळी, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.


वाहतूक समस्या,अपु-या गटारींबाबत त्वरित कार्यवाही करा - इनाम संघटनेची महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी