बातम्या
गांधीनगरातील वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा
By nisha patil - 10/27/2023 7:13:10 PM
Share This News:
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रिकल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, अशा सर्व वस्तू होलसेल व रिटेल मिळण्याचे प्रमुख बाजारपेठ आहे ,गांधीनगर मध्ये सणासुदीला खरेदीसाठी मोठी झुंबड उडते, त्यामुळे दिवाळी सणाला बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होते, सदर भागामध्ये शंभर ते दीडशे ट्रान्सपोर्टची ऑफिस व त्यांची मोठ मोठी गोडाऊन असून रोज मोठ्या प्रमाणात मालाची ने- आन ह्या रोड वरून करत असतात त्यांना माल ने आणण्यासाठी योग्य वेळ जरी ठरवून दिली असली तरी त्या वेळेचा, व नियमांचा काही जण भंग करतात व दुकानांमध्ये जाऊन मोठमोठ्या वाहनातून माल डिलिव्हरी देत असतात.
माल डिलिव्हरी रस्त्यामधून देत असताना वाहतुकीची रस्त्यामध्ये कोंडी होत असते याबाबतही प्रशाशनाकडून संबंधितांना सूचना करण्यात याव्यात, गांधीनगर बाजारपेठेचा विस्तार तावडे हॉटेल ते चिंचवड रेल्वे फाटक पर्यंत झालेला असून प्रशासनाने दिवाळी सणाला वीट भट्टी परिसरात चार चाकी वाहनांना आत मध्ये प्रवेश बंदी करता, त्यामुळे ग्राहक त्याच परिसरात आपली खरेदी करून जातो
, त्यामुळे रस्ता मोठा होऊनही बस स्टॉप जवळील सर्वच मार्केटमधील दुकानांमध्ये ग्राहक खरेदीसाठी जात नाही, त्या परिसरातील दुकानांनाही मोठ्या रकमेचे भाडे असून ग्राहक खरेदीसाठी येत नसल्याने त्यांना सणासुदीला आर्थिक फटका बसतो, रस्ता लहान असूनही पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी योग्य व चांगले दिवाळी सणाला वाहतुकीचे नियोजन केले होते, बस स्टॉप परिसरातील दुकानांमध्ये खरेदीला जाणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची व्यवस्था करावी त्यामुळे त्या भागातील ही दुकानांमध्ये ग्राहक खरेदीला जाऊ शकतो चार ते पाच रस्त्यामध्ये वाहतुकीचे स्पॉट बघून कर्मचारी उभे केले असता योग्य नियोजन होऊ शकते रस्ता मोठा झाला त्याचा फायदा सर्व दुकानदारांना होऊन ग्राहकांनाही आपल्या पसंतीच्या दुकानांमध्ये खरेदी करता येण्याबाबतचे आपण योग्य व सुसज्ज असे नियोजन करावे अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये व ग्राहकांना खरेदी करताना वाहतूक कोंडी मुळे गरसौय होउ नये व व्यापाऱ्यांना ही कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेत प्रशासनाने वाहतूकीचे योग्य नियोजन लावावे. अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने मा.अर्जुन घोडे-पाटील,सहायक पोलिस निरीक्षक, गांधीनगर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की व्यापाऱ्यांना व ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत वाहतुकीचे योग्य नियोजन करू व वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवासेनेचे संतोष चौगुले,विभागप्रमुख विरेंद्र भोपळे, हिंदुत्ववादी शरद माळी, शाखाप्रमुख दिपक अंकल, फेरीवाले संघटनेचे बाळासाहेब नलवडे,ग्राहक सेनेचे संजय काळुगडे, ग्राहकसेनेचे तालुकाप्रमुख जितू कुबडे,विभागप्रमुख दिपक पोपटाणी,गांधीनगर उपप्रमुख दिपक धिंग, किशोर कामरा, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, नवाज जमादार, आबा जाधव, किरण मुळके, जितू चावला, रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा, शंकर गजवानी, सुनील बदलानी, जय ठहकारानी, सुनिल लालवानी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच गांधीनगर व्यापारपेठेतील व्यापारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधीनगरातील वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा
|