बातम्या

रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सकारात्मक पावले उचला : राजेश क्षीरसागर

Take positive steps to retain daily wage workers in service


By nisha patil - 8/24/2024 2:51:50 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिकेच्या पवडी, आरोग्य, ड्रेनेज, उद्यान व अन्य विभागाकडे गेली ३० ते ३५ वर्षे रोजंदारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ५०० च्या वर आहे. या कर्मचाऱ्याना सोलापूर परभणी महानगरपालिकेच्या धर्तीवर कायम सेवेत घेण्याबाबत नियमोचीत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासन नगरविकास विभागाचे महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार रोजंदारी  कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, यामध्ये महानगरपालिकेने सकारात्मक पावले उचलावीत, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. मनपा रोजंदारी कर्मचारी यासह शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.


रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सकारात्मक पावले उचला : राजेश क्षीरसागर