बातम्या
खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांवर सक्त कारवाई करा
By nisha patil - 11/10/2023 7:24:00 PM
Share This News:
शैक्षणिक नोकरी करत असताना महाविद्यालय व शाळेव्यतिरिक्त खाजगी क्लासेस घेणे हे बेकारदेशीर आहे अशा शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी कॉम्रेड चे चंद्रकांत यादव यांनी शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्या कडे केली.
अनेक शाळा,महाविद्यालयातील शिक्षक ,शाळा व कॉलेज मधील अनुदानित पगार घेत असताना स्वतंत्र खाजगी क्लासेस कॉलेज व शाळेजवळ चालू करतात आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल गुणांचे आमिष दाखवून विद्यार्थांना त्या क्लासेस मध्ये प्रवेश घ्यायला लावतात. याबाबत
वेळोवेळी कॉलेजचे प्राचार्य, संस्थापक, अध्यक्ष, आणि उपसंचालकना याबाबत तक्रार केलेल्या आहेत.
४ ऑगस्ट रोजी रजिस्टर ए डी ने नोटीस पाठवल्या आहेत अद्यापही याबाबत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही कारण बऱ्याच वेळा कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अशा शिक्षकांना पाठीशी घालतात. या संदर्भात कॉम्रेड चे चंद्रकांत यादव यांनी आज शिक्षणाधिकारी आंबोकर यांची भेट घेतली . अशा शिक्षकांवर लवकरच कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन आंबोकर यांनी दिले आहे
यावेळी कॉम्रेड चे चंद्रकांत यादव ,बी एस पाटील ,उदय शिपेकर,प्रकाश मोरे,संभाजी सावंत ,राहुल टेकाळे ,रितेश दलाल ,अमित निगवेकर ,विद्यानंद उपाध्ये ,अतुल निंगुरे ,आनंद भोजने ,किरण मोळे ,श्रीकांत सौगंधे आदी उपस्तिथ होते
खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांवर सक्त कारवाई करा
|