बातम्या
साखरेऐवजी गुळ टाकून घ्या चहा ; होतील ‘हे’ फायदे
By nisha patil - 3/25/2024 7:25:31 AM
Share This News:
पूर्वी खेडोपाडी गुळाचाच चहा वर्षाचे बाराही महिने घेतला जात असे. आता गुळाचा वापर कमी होत चालला आहे. काही पदार्थांमध्ये टाकण्यासाठीच गुळाचा वापर केला जातो. खरं तर गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. परंतु, गुळाच्या चहा हिवाळ्यात घेतल्यास अधिक चांगले असते. कारण गुळ हा गरम पदार्थ आहे. सर्दी-पडस्यापासून गुळामुळे आराम मिळतो. गुळाचा चहा प्यायल्याने डायजेस्टिव एन्जाइम्स अॅक्टिवेट झाल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.
यामध्ये आयरन अधिक असते जे एनीमिया टाळण्यात मदत करते. गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात आणि त्वचेचा रंग उजळतो. गुळाच्या चहामध्ये पोटॅशियम अधिक असल्याने हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत होते. यामधील सोडियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात मदत करते. यामधील अँटीऑक्सीडेंट्स म्हातारपणाचा प्रभाव कमी करतात. गुळ हे गरम असते. जे सर्दी-खोकल्यापासून आराम देण्यात मदत करते. हा चहा प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने सांधेदुखी कमी होते. गुळातील कार्बोहायड्रेटमुळे कमजोरी दूर होते आणि एनर्जी मिळते.
साखरेऐवजी गुळ टाकून घ्या चहा ; होतील ‘हे’ फायदे
|