बातम्या
उत्तम आरोग्यासाठी घ्या ह्या ‘हेल्थ शॉट’
By nisha patil - 11/3/2024 7:30:17 AM
Share This News:
थंडीच्या दिवसात शरीराला हेल्थ शॉट मिळणे आवश्यक असते. आता हेल्थ शॉट म्हणजे काय तर अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमीन आणि मिनरल्स यांचं एकत्रित ज्यूसच्या स्वरूपात असणारं मिश्रण. हे घटक घरातील मसाले, भाज्या, फळं यांच्या माध्यमातून मिळू शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आपल्या घरातील किचनमध्ये असलेल्या दोन –तीन गोष्टी या औषधांचं काम करतात. यामध्ये आल्याच्या पावडरमध्ये दालचिनीची पावडर, लिंबू, जिऱ्याची पावडर यांचा रस एकत्र केल्यास तो सर्दी, खोकला आणि अॅसिडीटीसाठी गुणकारी ठरतो.
गुणकारी निम शॉट
निम (कडुलिंब)
निम शॉट देखील आरोग्यासाठी फार गुणकारी ठेवतो. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार, कडुलिंबामध्ये सर्व आजारांना बरं करण्याची क्षमता असते. मार्चमध्ये कडुलिंबाच्या झाडाला नवीन पानं येतात. या पानांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय यामुळे आजारांना आणि इन्फेक्शनला दूर ठेवण्यास मदत होते.हे शॉट किती वेळा घ्यावे काही प्रकारचे शॉट जसं की लिंबू आणि आलं हे दिवसातून एक वेळा घेणं चांगलं असतं. तर पावसाळ्याच्या दिवसांत आल्याच्या रसामध्ये आवळा आणि हळद घातल्याने चांगलं असतं.
अलोवेरा शॉट
अलोवेरा शॉट म्हणजेच त्याचा रसही दिवसातून एकदा घेणं फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन असतं. ज्यामुळे त्वचेच्या आणि पुरळ येण्याच्या समस्या दूर होतात.
याशिवाय जीवनशैलीत बदलं करणंही फार गरजेचं आहे.
धोके समजून घ्या कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणं घातक असतं. स्पिरुलिना शॉट अतिप्रमाणात घेतल्याने ते हानिकारक ठरू शकतो. काही प्रकारच्या शॉटमध्ये केवळ फळांचाच समावेश असतो. असे ज्युस घेतल्याने इन्सुलिनची पातळी वाढण्याची शक्यता असते.
उत्तम आरोग्यासाठी घ्या ह्या ‘हेल्थ शॉट’
|