बातम्या
सांगवडेच्या तलाठी व कोतवालला लाचप्रकरणी अटक
By nisha patil - 11/2/2025 8:27:58 PM
Share This News:
वारसा हक्काने नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती तीन हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी करवीर तालुक्यातील सांगवडे इथला तलाठी अविनाश मधुकर कोंडिग्रेकर व कोतवाल सर्जेराव बंडा कुंभार यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
सोमवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आसमा मुल्ला, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलिस नाईक सचिन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे यांनी केलीय
सांगवडेच्या तलाठी व कोतवालला लाचप्रकरणी अटक
|