बातम्या
आंबेवाडीत “तंटामुक्ती” की “मटकाभक्ती”? सुसंस्कृत गावात मटका खुलेआम सुरू
By nisha patil - 3/19/2024 5:21:14 PM
Share This News:
आंबेवाडीत “तंटामुक्ती” की “मटकाभक्ती”? सुसंस्कृत गावात मटका खुलेआम सुरू
पोलिस कारवाईची मागणी-“तात्याचं” कुंपणच शेत “खात” असल्याचा संतापजनक प्रकार
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारं आंबेवाडी ता.करवीर हे महामार्गाला लागून असणारे प्रमुख गाव त्यामुळे इथल्या तरुणांना उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक व तरुणाईला मटक्याच्या खाईत लोटायचे काम काही पुढारी करताना दिसत आहेत.कष्टाने मिळवून खाणाऱ्या कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे काम होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबेसुद्धा याला विरोध करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त अभियानात सामील होऊन काहीजण पदाचा गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले आहे.किराणा मालाच्या दुकानाच्या नावाखाली पडद्याआड खुलेआम मटका चालू आहे. तरी पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहेत याची उलटसुलट चर्चा गावाच्या कट्ट्यावर होत आहे.सुसंस्कृत असणाऱ्या आंबेवाडी गावाला यामुळे कोणता विकास साधता येणार आहे?त्यामुळे इथे ”तात्याचं” कुंपणच “शेत” खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे सदर मटक्याच्या बुकीवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
आंबेवाडीत “तंटामुक्ती” की “मटकाभक्ती”? सुसंस्कृत गावात मटका खुलेआम सुरू
|