बातम्या
कोल्हापूरची अनुक्रिया झळकली हाइट्स ऑफ सक्सेस मासिकाच्या मुखपृष्ठावर...
By nisha patil - 12/12/2024 12:52:21 PM
Share This News:
कोल्हापूरची अनुक्रिया झळकली हाइट्स ऑफ सक्सेस मासिकाच्या मुखपृष्ठावर...
कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा...
शांतिनिकेतन शाळेमध्ये इयत्ता सातवीत शिकण्याऱ्या विश्वविक्रमवीर भारत विभूषण प्रा.डॉ.अनुप्रिया गावडे या विद्यार्थिनीने भारताच्या अतिशय नावाजलेल्या द हाइट्स ऑफ सक्सेस या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकून कोल्हापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. बाल हक्क कायदा व संविधान जाणीव जागृतीचे ब्रँड अँबेसिडर असणारी अनुप्रिया गावडे हिने आजपर्यंत अनेक जाणीव जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहे.
त्यासोबत 50 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मान देखील पटकाविला आहे. सायन्स फाउंडेशनच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षेमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँक त्याचबरोबर रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज परीक्षेमध्ये देशपातळीवर अव्वल क्रमांक मिळवण्याचा पराक्रम तिने केला आहे व पन्नास हून अधिक सुवर्णपदकांची लय लूट केली आहे. आज पर्यंत पाच विश्वविक्रमाला तिच्या नावे असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यकारी मंडळाची ती सदस्य आहे.
नुकताच तिला सामाजिक न्याय मंत्रालय दिल्ली समारोह समिती यांच्याकडून भारत गौरव सन्मान पुरस्कार आणि रणरागिणी ताराराणी हे पुरस्कार देखील तिला जाहीर झाले आहेत.. ती उत्तम वक्ता असून ऑल इंडिया लिटल सुपर स्पीकर होण्याचाही मान तिने यापूर्वी मिळवला आहे क्रीडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केले असून अनेक पारितोषिकाची मानकरी ठरली आहे.
कोल्हापूरची अनुक्रिया झळकली हाइट्स ऑफ सक्सेस मासिकाच्या मुखपृष्ठावर...
|