बातम्या
ताराराणी महोत्सव २०२४
By nisha patil - 1/31/2024 11:18:25 PM
Share This News:
ताराराणी महोत्सव २०२४ - प्रचार व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सालाबादप्रमाणे महिला स्वयंसहायता समूह निर्मित वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव -विभागीय ताराराणी महोत्सव २०२४ प्रायव्हेट हायस्कूल मैदान, कोल्हापूर येथे दि. २ फेब्रुवारी-२०२४ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करणेत आलेला आहे . सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २ फेब्रुवारी-२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता हसन मुश्रीफ पालकमंत्री कोल्हापूर यांचे हस्ते होणार आहे. सदर विभागीय महोत्सवामध्ये विभागातील पाच जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूह सहभागी होणार आहेत. तसेच या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुढील प्रमाणे दहा दालन केलेले आहेत.
यामध्ये १) गोड दालन उदा. गुळ, मध, गुळ पावडर २) मसाले दालन - कांदा,लसून चटणी, तिखट चटणी ३) मिलेट दालन तृण धान्य, कडधान्य, नाचणी, रागी ४) घरगुती उत्पादने दालन - पापड, लोणचे, कुरडई, शेवया ५) वन अमृत दालन - करवण, जांभूळ, आंबा जाम, सिरप, पल्प ६) डेअरी आणि बेकरी दालन • खवा, बर्फी, बेकरी पदार्थ ७) ज्वेलरी आणि गारमेंट्स दालन ८) लेदर उत्पादने दालन - शूज, चप्पल, कोल्हापुरी चप्पल ९) हस्तकला दालन बांबू व मातीपासून बनवलेल्या वस्तू १०) भोजन स्टॉल दालन तांबडा-पांढरा रस्सा, शाकाहारी, मांसाहारी जेवण, नाष्टा इ. अशाप्रकारे खवयासाठी मेजवानी असणार आहे. या दहा दालनामध्ये एकूण २०० स्टॉलचे नियोजन केले असून त्यापैकी १४५ वस्तू स्वरूपातील व ५५ खाद्याचे आहेत. त्यापैकी विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण वस्तूचे एकूण ५० स्वयंसहाय्यता समूह सहभागी होणार आहेत. दररोज तालुक्यातून महिला उपस्थित राहणार आहेत. तसेच या कालावधीमध्ये सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणेत आले आहेत. याचा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी आपणास आवाहन करीत आहे.
ताराराणी महोत्सव २०२४
|