बातम्या

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

Tariffs for meals and refreshments should be submitted for the National Cadet Army Training Camp


By nisha patil - 10/7/2024 3:38:25 PM
Share This News:



महाराष्ट्र बँटरी एन.सी.सी. ऑफिस कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीर (क्र. 318) दिनांक 30 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर कोल्हापूर व शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे प्रशिक्षण शिबीर (क्र. 333) दि. 8 नोव्हेंबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबीराचा कालावधी, उपस्थित संख्या व इतर माहितीनुसार लागणारे जेवण व अल्पोपहार मापक दरात पुरविण्यासाठी इच्छुक भोजन व अल्पोपहार पुरवठादारांनी आपले दरपत्रक बंद लिफाफा करून दिनांक 15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत समादेशक अधिकारी 1 महाराष्ट्र बैटरी एन.सी.सी. ऑफिस, एन.सी.सी. भवन, सम्राट नगर कोल्हापूर येथे सादर करावेत, असे आवाहन समादेशक अधिकारी ले. कर्नल एम. सी. मुथंना यांनी केले आहे.

 नमुद कालावधीत भोजन व अल्पोपहार बाबतीत कमीत कमी दराने व चांगल्या प्रतीत पुरवठा करणाऱ्यासोबत करार करण्यात येईल. याबाबतीतील इतर सर्व अधिकार शिबीर प्रमुख यांच्याकडे राखून ठेवण्यात येतील. जेवण व अल्पोपहार यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच कार्यालयात उपलब्ध आहे. ज्यांना दर पत्रक सादर करावयाचे आहे त्यांनी दर पत्रक सादर करण्यापूर्वी जेवण यादी व अटी शर्ती व इतर माहिती घेवून दरपत्रक सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी क्र. 0231-2694580 वर संपर्क साधावा.


राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत