बातम्या
टाटा ची बहुचर्चित CURVV EV कार गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कोल्हापूर मध्ये प्रथमच दाखल
By nisha patil - 8/23/2024 3:01:00 PM
Share This News:
टाटा ची बहुचर्चित CURVV EV कार गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कोल्हापूर मध्ये प्रथमच दाखल
कणेरी (प्रतिनिधी) टाटा मोटर्स ने MID SUV COUPE गटातील CURVV हि इलेक्ट्रिक कार बाजारात आणली असून तिची किंमत 17.50 लाख ते 22 लाख रुपये आहे. तसेच coupe डिसाईन मधील पहिलीच कार आहे.
CURVV ची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सर्व साधारण ५८५ किलो मीटर अंतर पार करू शकते.कोल्हापूर ते पुणे व परत पुणे ते कोल्हापूर एवढे अंतर एका चार्जिंग मध्ये अशी सर्वोत्तम रेंज ह्या सेगमेंट ला दिली आहे.क्विक १५ मिनिटाच्या चार्जिंग मध्ये १५० KM ची रेंज , 70KV चार्जेर ने फक्त ४० मिनिटात तिचे ८०% चार्जिंग पूर्ण असे अनेक आविष्कारी फीचर्स ह्या कार मध्ये आहेत.CURVV गाडीचा दिमाखदार व भव्य अनावरण सोहळा SBI हेड राजीव गुप्ता, SM घाटगे चे हेड मिलिन्द घाटगे , उद्योजक सौरभ नलगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडे,बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर विशाल कुमार सिंग ह्या मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
कार सर्व आधुनिक फीचर्स ने युक्त असून लवकरात लवकर युनिटी मोटर्स च्या गोकुळशिरगाव शोरूम मध्ये गाडीचे टेस्ट ड्राईव्ह घेऊन बुकिंग करण्याचे आवाहन कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर विवेक सावंत ,CEO गुरिंदर सिंग व बिसिनेस हेड नितीन बनवणे ह्यांनी केले आहे
टाटा ची बहुचर्चित CURVV EV कार गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कोल्हापूर मध्ये प्रथमच दाखल
|