बातम्या

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील तांत्रिक अडचणीमुळे शिक्षक हैराण

Teachers are puzzled by the technical difficulties in the campaign of Chief Minister My School Beautiful School


By nisha patil - 1/18/2024 12:25:43 PM
Share This News:



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील तांत्रिक अडचणीमुळे शिक्षक हैराण 

कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियांतर्गत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शाळा संबंधित विविध तीस स्वरूपातील छायाचित्रे स्कूल पोर्टलवर अपलोड करायची आहेत. मात्र या पोर्टलवर सातत्याने तांत्रिक अडचण येत असल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचे की नुसती छायाचित्रे अपलोड करायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. 
   राज्यातील सर्व व्यवस्थापन माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यासाठी स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राबविले जात आहेत त्यात विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग शाळा व्यवस्थापनाचे उपक्रम व त्यात इतर घटकांचा सहभाग आणि एकूण शाळेच्या कामगिरीवर मूल्यांकन केले जाणार आहे. त्यातील विजेतांना बक्षीस दिले जाणार आहे याबाबतची माहिती शाळांनी स्कूल पोर्टलवर भरायची आहे. त्यासाठी या पोर्टलमध्ये स्वतंत्र टॅब दिला आहे. पण त्यात लॉगिन करण्यापासून तांत्रिक अडचण सुरू होते ती फोटो अपलोड करेपर्यंत कायम आहे. त्यामुळे शिक्षण हैराण झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता, अद्याप त्यातून मार्ग निघालेला नाही. या अभियानांतर्गत विविध 30 प्रकारचे फोटो अपलोड करायचे आहेत त्यांची संख्या कमी करण्याची मागणी शिक्षकांतून होत आहे. 

फोटो अपलोड करताना तांत्रिक अडचणी

या अभियानांतर्गत उपक्रमांची माहिती भरताना त्याबाबतचे फोटोही अपलोड करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित फोटो दोन एमबी या आकारात अपलोड करावा लागत असल्याने यापूर्वी काढलेला फोटोचा आकार बदलणे आणि असा बदल केल्यानंतर त्या फोटोचा दर्जा खराब होत आहे. माहिती भरताना ती कोणत्या फ्राँट्मध्ये भरायची त्याची माहिती मिळत नाही. पोर्टलवर सातत्याने एरर दाखवत असल्यामुळे फोटो अपलोड आणि लॉगिन होत नाही. परसबाग व कंपोस्ट खत प्रकल्प शहरी शाळांना राबवण्यात अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याऐवजी शाळांवर या अभियानाबाबत सहभागी होण्याची सक्तीसाठी केली जात असल्याची तक्रार काही शिक्षकांनी केली आहे.


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील तांत्रिक अडचणीमुळे शिक्षक हैराण