मनोरंजन

‘सत्यप्रेम की कथा’ चा टीझर नुकताच रिलीज

Teaser of Satyaprem Ki Katha released recently


By nisha patil -
Share This News:



बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन  यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. कियारा आणि कार्तिक यांच्या  ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. 
सत्यप्रेम की कथा'  या चित्रपटाचा टीझर कियारा अडवाणीने  इंस्टाग्राम अकाउंटवर  शेअर केला आहे. 'बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे हों, हंसी जो कभी कम ना हो. आंखें जो कभी नम ना हो और अगर हो तो बस इतना जरूर हो आंसू उसके पर आंखे मेरी नम हो' या  कार्तिक आर्यनच्या डायलॉगनं   'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. कियारानं हा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, "आजपासून सुरु होत आहे, 'सत्यप्रेम की कथा' ". कियारानं शेअर केलेल्या या  'सत्यप्रेम की कथा'  चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


‘सत्यप्रेम की कथा’ चा टीझर नुकताच रिलीज