बातम्या
या मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड
By nisha patil - 7/5/2024 2:03:21 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये सकाळी ७ वा. पासून मतदान प्रक्रियेला सुरू झालीय. कोल्हापूर लोकसभा अंतर्गत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया सुरूय. दरम्यान, दोनवडे व पडळ इथल्या मतदार केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं एक तास मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. एक तासानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली.
सांगरूळ इथल्या मतदान केंद्रावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचे ईव्हीएम वरील नावासमोरील बटन दाबताच व्हीव्हीपॅट मध्ये येणाऱ्या त्यांच्या नावाच्या चिठ्ठीमधील नावामध्ये व चिन्हा मध्ये आडवी रेष येत असल्याबाबत उमेदवार बाजीराव खाडे यांनी ऑब्जेक्शन घेऊन त्याबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिली. त्यानंतर एक तासांनी ईव्हीएम बदलण्यात आले. या व्यतिरिक्त करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे सुरू आहे.
या मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड
|